
कात्रज/लोकसत्य – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील सराईत गुन्हेगार नामे सिद्धार्थ उर्फ रोहन नामदेव सरोदे वय २१ वर्षे, रा. वाघजाई माता मंदिरा समोर, भिलारेवाडी, कात्रज, पुणे यास एम. पी.डी.ए कायद्यातंर्गत सिंधुदुर्ग मध्यवर्ती कारागृह येथे
स्थानबध्द केले बाबतची माहिती भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मार्फत मिळाली.
अधिक माहिती पुढीलप्रमाणे, पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी
पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले होते. त्याप्रमाणे भारती सराईत व अटल गुन्हेगार विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणेचा गुन्हे अभिलेखावरील नामे- सिद्धार्थ उर्फ रोहन नामदेव सरोदे वय २१ वर्षे, रा. वाघजाई माता मंदिरा समोर, भिलारेवाडी, कात्रज, पुणे याचे विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे सन स न २०१३ सालापासून तो विधीसंघर्षीत बालक असल्यापासून आजतागायत खुन, दरोड्याची पूर्वतयारी करून घातक शस्त्रासह दारोड्यासाठी एकत्र जमणे, बेकायदेशीर शस्त्र हत्याराने वार करून गंभिर बाळगणे, जनतेमध्ये दहशत करीत धमकावणे, धारदार दुखापत करणे, वाहनांची तोडफोड करुन नुकसान करणे यासारखे एकूण ०५ गुन्हे दाखल आहेत. स्थानबद्ध इसमाचे वाढते गुन्हेगारी कारवाईना आळा घालणे साठी सन २०२४ साली भारतीय न्याय संहीता कलम १२ ९ प्रमाणे कारवाई करुन देखिल त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक सुधारणा झालेली नव्हती.
वरील नमुद सराई त गुन्हेगार व स्थानबध्द इसम याचेविरुध्द वेळोवेळी
प्रतिबंधक कारवाई करुनही त्याचे वागणुकीत काहीएक फरक पडलेला न व्हता. तो अत्यंत क्रूर, खुनशी व भांडखोर असुन तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. तेथील सर्वसामान्य, शांतताप्रिय नागरीकांना विनाकारण त्रास देवुन आप ला गुन्हेगारी हेतु साध्य करीत आहे. त सेच बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगून
लोंकामध्ये दहशत निर्माण केली आहे.
त्याचे दहशतीमुळे व भितीपोटी त्याचेविरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे मनात भिती निर्माण होवुन त्यांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. म्हणुन श्री. सुदर्शन गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यास स्थानबदध करणे बाबत चा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त सोा, पुणे शहर यांना सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी दि. १२/०८/२०१६ रोजी सिंधुदुर्ग मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबदध करण्याचे आदेश दिलेले आहेत.

भारती विद्यापीठ पोलीसांकडुन मोक्का, तसेच एम. पी. डी. ए. कारवाया गुन्हेगार यांचेवर करण्यात येत आहेत. यापुढेही अभिलेखावरील गुन्हेगारांवर यासारख्या ठोस व प्रभावी कारवाया करण्यात येत आहेत. सराईत गुन्हेगारा कडून अशा प्रकारे कोणताही अनुचीत प्रकार घडु नये या अनुषंगाने पोलीसांकडुन समाजकंटक व अटल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.
मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संजय दराडे, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मिलिंद मोहिते, पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर, राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची उल्लेखनिय कामगीरी सुदर्शन गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, व पो.हवा. विशाल वारुळे, पोलीस अंमलदार श्रीकांत कुलकर्णी व पोलीस अंमलदार स्वप्नील बांदल यांनी केली आहे.

