
आकुर्डी : आकुर्डीतील नवनगर शिक्षण मंडळ संचलित श्री सरस्वती बालक मंदिरात प्रथम सत्रातील पालक सभेचे आयोजन नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक डॉ.श्री. गोविंदराव दाभाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी सरस्वती प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री. राजू माळे, पालक प्रतिनिधी सौ. वृषाली सांगळे, कु.स्वाती पाटील- जाधव, सौ.शारदा काळे, श्री. प्रकाश कोळप व समस्त पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. शिक्षकांप्रमाणेच पालकांनीही पाल्याच्या प्रगतीसाठी पाल्याच्या शालेय अभ्यासात हातभार लावावा. उत्तम सवयी, उत्तम संस्कार, शाळेबरोबरच कुटुंबातील वातावरण विद्यार्थ्यांच्या विकासात महत्वपूर्ण असते, असे प्रतिपादन डॉ. दाभाडे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु. स्वाती पाटील यांनी केले, तर आभार सौ.शारदा काळे यांनी मानले. पालक सभा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
