
महर्षीनगर : (श्री बी. व्ही.जाधव सर) स्वारगेट गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाची कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेत अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थी प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन सन्माननीय मुख्याध्यापक श्री. वसईकर सर यांच्या अध्यक्षतेखाली दामले प्रशाला सभागृहात करण्यात आले. या विद्यार्थी प्रबोधन कार्यशाळेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन व प्रबोधन केले.
या कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्री.वसईकर सर, स्वारगेट पोलीस स्थानकाचे पीआय श्री. यशवंत निकम, आर.के. फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त व समुपदेशक श्रीमती भाग्यश्री साळुंखे, स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक अजय खेडकर , पर्यवेक्षक अनिल तंवर, शिक्षक व प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.

या विद्यार्थी प्रबोधन कार्यशाळेत सन्माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या हस्ते प्रशालेच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना आदर्श विद्यार्थी व उत्तम नागरिक बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संयम, विनम्रता, शिस्तबद्धता, उत्तम आचरण, मैत्री, संस्कार या सदगुणांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यसनाच्या आधीन केल्यामुळे आपल्या शरीर,मन आरोग्य, कुटुंब व समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत, संयम बाळगा व निर्व्यसनी रहा, असे आवाहन करत स्वारगेट पोलीस स्टेशनचे पी आय श्री यशवंत निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करत विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन केले . या शैक्षणिक वर्षात प्रशालेच्या पाच गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर.के. फाउंडेशनच्या वतीने सानुग्रह शैक्षणिक मदत करण्यात आली.
अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आपण कसे वागले पाहिजे, जीवन समृद्ध बनवण्यासाठी कोण कोणत्या आदर्श उत्तम गोष्टींची आवश्यकता जीवनामध्ये असते, त्या सर्वांशी मैत्री करत आपल्या जीवनाचा आलेख कसा उंचावता येईल, यांचे अनुभव कथन करत स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक अजय खेडकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

या विद्यार्थी प्रबोधन कार्यशाळेचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री.रमेश वसईकर सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आश्रू बनकर यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन श्री. स्वप्निल सागडे सर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

