
सातारा/लोकसत्य : शहरामध्ये औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात यावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख रफीक शेख यांचेमार्फत नगरपरिषदेला देण्यात आले.
सातारा/लोकसत्य : सातारा शहरामध्ये सतत चालू असलेल्या पावसामुळे सर्वत्र झाडाझुडुपे वाढल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक घराभोवती व प्रत्येक शाळेभोवती औषध फवारणी व फॉगिंग मशीन सहाय्याने धूर फावरणी करणे गरजेचे आहे, आरोग्य विभागातर्फे सर्व्हे करण्यात यावा.

प्रशासनाने तात्काळ उपयोजना करत साथीच्या रोगांना आळा घालणे गरजेचे आहे, नागरिकांमध्ये डेंगू, मलेरिया, हिवताप व साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी नगरपालिकेने ठोस पावले उचलावीत असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन देताना जिल्हा प्रमुख रफीक शेख, संघटक महेश गराटे, उपाध्यक्ष ऍड. दशरथ निकम ,वाहतूक अध्यक्ष नाजीम बागवान, सचिव महबूब पठाण, इम्रान कच्ची , सुरज भोसले ,संकेत भोईटे ,अमोल नलावडे, इत्यादी उपस्थित होते.

