पिंपरी-चिंचवड :- महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित ‘सहावी पिंपरी-चिंचवड मिक्स बॉक्सिंग स्पर्धा’ – उद्घाटन सोहळा आज येथे या भव्य क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू सहभागी झाले.
याप्रसंगी प्रथम आमदार विलासशेठ लांडे, मा.अजित गव्हाणे, विरोधीपक्ष नेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर अण्णा चिंचवडे, विकास साने, पंकज भालेकर तसेच, कविताताई आल्हाट, सीमाताई सावळे, विक्रांतदादा लांडे, अमोल डोळस, सम्राट फुगे तसेच भोसरी विधानसभेतील सर्व आजी माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँगेस पिंपरी चिंचवड शहर चे पदाधिकारी यांच्यासह , प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
