
आकुर्डी : ( बी. व्ही. जाधव सर )
९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील बजाज ऑटो समाज सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुपूजन सोहळ्यात अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालयाच्या तबला वादक वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरुवर्यश्री. नारायण जगताप गुरुजींविषयी कृतज्ञता तबलावादनातील राग व ताल कला सादर करत व्यक्त केली.

यावेळी प्रसिद्ध गायिका सौ. जयश्री पवार, व्यवस्थापक सौ. स्वाती देशपांडे, गुरुवर्य श्री नारायण जगताप, सचिव सौ. अनुजा सप्ताश्व,तानाजी पाटील, तबला वर्गाचे विद्यार्थी,पालक व रसिक श्रोते उपस्थित होते.

यावेळी सुप्रसिद्ध गायिका सौ. जयश्री पवार यांनी सुर-ताल -लय भावगीत भक्तीगीतांच्या रचना सादर करत रसिकांना भावतरंगानी मंत्रमुग्ध केले. यावेळी केंद्र व्यवस्थापक सौ. स्वाती देशपांडे यांनी गुरु विषयीचा आदर भाव मनोगतातून व्यक्त केला.

या संगीत सोहळ्यासाठी तबला साथ विद्यार्थी श्री. आदित्य पोतदार यांनी तर संवादिनीवर श्री तानाजी पाटील यांनी तर, अनिकेत करवंदे व दर्शन बनकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन श्री. प्रमोद जगताप यांनी केले.
